'.. तर त्यांनी संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं'

मोदींवर कडाडून टीका 

Updated: Apr 3, 2020, 11:27 AM IST
'.. तर त्यांनी संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं' title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी ९ वाजता देशाच्या नागरिकांशी संवाद साधला. मोदींनी रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील संपूर्ण दिवे बंद करून मेणबत्या पेटवून कोरोना विरोधात सामूहिक शक्ती दाखवण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या आवाहनावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड टीका केली आहे. 'देशाला इतकेही मुर्खात काढू नका.. ' असं म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे. 

जितेंद्र आव्हाड एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हा न्यूरोचा पुर्नजन्म म्हणतं.. अंधेरी रात में दिया तेरे हाथ में.... अशी गाण्याची ओळ देखील ट्विट केली आहे. पंतप्रधान मोदींकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही वेगळं बोलण्याची अपेक्षा होती. पण मोदी या संकटाचाही इव्हेंट करू पाहत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी यावेळी म्हटलं आहे.  

जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भात दोन ट्विट केले आहेत. 'भारताने कोरोनाविरूद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका.' या ट्विटमधून त्यांनी मोदींकडून काय अपेक्षा होती. हे सांगितलं आहे. आव्हाडांनी 'नागिन' या जुन्या हिंदी सिनेमातील कलाकारांचा हातात टॉर्च घेतलेला फोटोही पोस्ट केला आहे. 

तर दुसऱ्या ट्विटमध्ये 'नव्या निरोचा जन्म' आणि 'अंधेरी रात में दिया तेरे हाथ में' असं म्हणतं ट्विट केलं आहे. रविवारी रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटे घरात लाईट बंद करायच्या आहेत. या ९ मिनिटांत आपण हातात दिवे घेऊन उभं राहायचं. मोदींनी जनतेला हे आवाहन केलं आहे.