मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, इतर कर्मचारी १४ दिवस क्वारंटाईन

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Updated: Apr 3, 2020, 10:27 AM IST
मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, इतर कर्मचारी  १४ दिवस क्वारंटाईन title=

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याआधी धारावीमध्ये एका डॉक्टरला कोरोनाची लागण  झाली होती. आता बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या वडाळा बस डेपोत पुरवठा विभागात हा कर्मचारी काम करत आहे.  दरम्यान, या कर्मचाऱ्याला एसआरव्ही रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले आहे.

या बेस्ट कर्मचाऱ्याच्या संपर्कात आणखी काही कर्मचारी आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. शुक्रवारी हा कर्मचारी कामावर दाखल झाला होता. मात्र, आधी हा कर्मचारी सुट्टीवर होता. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोठे गेला होता. त्याच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच मुंबईच्या टिळकनगर भागात  हा कर्मचारी  राहत होता, त्या इमारतीला सील केले गेले आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा अधिक धोका वाढला आहे.

 दरम्यान, राज्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या गेल्या २४ तासात ८५ ने वाढली आहे. तर देशभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९६५ वर पोचली आहे. गेल्या २४ तासात ३२८ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या २४ तासात १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या ५९ व्यक्तींचा देशात मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ८५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ५९ नव्या रुग्णांची भर पडली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात ९, नगरमध्ये ९, ठाण्यात ५, बुलडाण्यात १ रुग्ण आढळून आला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४१६ झाली आहे. राज्यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.