निलेश राणेंची संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर 'जहरी' टीका

शिवसैनिकांची ओळख परेड म्हणजे आरोपीसारखी वागणूक 

Updated: Nov 26, 2019, 08:19 AM IST
निलेश राणेंची संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर 'जहरी' टीका  title=

मुंबई : महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनावर भाजप नेते टीका करताना दिसत आहेत. महाविकासआघाडीने 'आम्ही 162'द्वारे शक्तीप्रदर्शन करून आपलं संख्याबळ झालं असून सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची महाविकासआघाडी सज्ज आहे. असं असताना माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

निलेश राणेंनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. 'काँग्रेसवाले आजच्या तारखेत उद्धवला आणि संज्याला नागीण डान्स करायला सांगितलं तरी ते दोघ करणार. पण एका गोष्टीच वाईट वाटलं शिवसैनिकांना ओळख परेड करुन आरोपी सारखं दोन हॉटेल बदलून आणल गेलं आणि काँग्रेसवाल्यांनी शपथ घ्यायला लावली.'अशी टीका केली आहे. 

शिवसेना-भाजपमध्ये सत्तावाटपाच्या वादातून दुरावा आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत दररोज पत्रकार परिषद आणि ट्विटद्वारे भाजपचा समाचार घेतात. यांच्यावर निलेश राणेंनी या आधीदेखील टीका केली आहे. 'संजय राऊत हे गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखे आहेत,' अशी नीलेश राणेंनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. (हे पण वाचा - नारायण राणेंचा खळबळजनक दावा; महाविकासआघाडीने असा केला संख्याबळाचा 'जुगाड') 

 

ज्या ठिकाणी महाविकासआघाडीने 'आम्ही 162' असं म्हणत संख्याबळाचा दावा केला त्यावर नारायण राणेंनी संख्याबळाचा 'जुगाड' केल्याचं म्हटलं आहे. महाविकासआघाडीकडे संख्याबळ नसून फक्त 137 आमदारच उपस्थित असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नव्हे तर या १३७ आमदारांमध्येही विधान परिषदेच्या अनेक आमदारांचा भरणा होता, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या बहुमताच्या दाव्याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.