आता दूध दरवाढ ऑगस्टपासून होणार, लिटरला २५ रुपये

दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या आंदोलनानंतर सरकारने दुधाचे दर लिटरमागे २५ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. आता या घोषणेची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून होणार आहे. 

Updated: Jul 31, 2018, 10:05 PM IST
आता दूध दरवाढ ऑगस्टपासून होणार, लिटरला २५ रुपये title=

मुंबई : दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या आंदोलनानंतर सरकारने दुधाचे दर लिटरमागे २५ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. आता या घोषणेची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून होणार आहे. 

नागपूर पावसाळी अधिवेशनात २१ जुलैपासून अंमलबजावणीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र खासगी तसंच शासनाच्या दूध सहकारी संस्थांनी तांत्रिक कारणामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. आता १ ऑगस्टपासून लिटरमागे २५ रुपये मिळणार आहेत. 

दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पशू व दुग्धसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी अखेर पावसाळी अधिवेशनात विधानसभेत केली होती. दुधाचा दर वाढवून देण्यासाठी चार दिवस आंदोलन सुरु होते. राज्यसरकारने दुधाला २५ रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर दूधकोंडीचा प्रश्न सुटला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी यांनी दूध दरासाठी राज्यात आंदोलन सुरु केले होते.