'एक गाव - एक पोलीस', नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवा उपक्रम

50 हजारपेक्षा जास्त पोलीस आवश्यक आहेत.

Updated: Aug 24, 2018, 08:57 PM IST
'एक गाव - एक पोलीस', नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवा उपक्रम title=

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्था, राज्याची भौगोलिक व्याप्ती, वाढलेली लोकसंख्या आणि तुलनेत अपुरे पोलीस बळ हे सर्व लक्षात घेता प्रायोगिक तत्वावर ' एक गाव - एक पोलीस ' ही संकल्पना राबवायला सुरुवात झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

15 ऑगस्टपासून औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हा प्रयोग सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात संपर्क राहणार असून ऐनवेळी उदभवलेल्या परिस्थितीमध्ये काम करणे सोपे जाणार आहे. 

राज्यात सुमारे अडीच लाख पोलीस कर्मचारी असून लोकसंख्या लक्षात घेता किमान सुमारे 50 हजारपेक्षा जास्त पोलीस आवश्यक आहेत. विशेषतः ग्रामीण भागात पोलीस कर्मचारी यांची कमतरता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर एक गाव - एक पोलीस ही संकल्पना राबवण्यात येत आहे.