Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : स्मार्टफोन खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये स्मार्टफोनच्या मेमरीपासून त्यांच्या कॅमेरापर्यंत बऱ्याच गोष्टींचा विचार होतो.   

सायली पाटील | Updated: Apr 30, 2024, 03:38 PM IST
Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन  title=
Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon Summer Sale Check Details in marathi

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या स्मार्टफोनच्या खरेदीचा विचार करत आहात? तर तुमची प्रतीक्षा संपली आहे.  कारण, ई कॉमर्स साईट फ्लिपकार्टच्या बिग सेविंग डेज सेलची घोषणा झाली असून, 3 ते 9 मे दरम्यान तुम्हाला अनेक गोष्टी सवलतीच्या दरानं खरेदी करता येणार आहेत. 

अॅमेझॉनच्याही सेलची सुरुवात 2 मे पासून सुरु होणार असून ही सवलत 9 मे पर्यंत सुरु राहणार आहे. या दोन्ही आघाडीच्या ई कॉमर्स साईटवरून तुम्हाला टॅबलेट, लॅपटॉप आणि इतर अनेक गोष्टी स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.

कोणकोणत्या गोष्टींवर असेल सवलत? 

अॅमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये Redmi 13C, Redmi Note 13 Pro, Samsung Galaxy M34, Xiaomi 14, Samsung Galaxy S23, iQOO Z9, Galaxy S24, Tecno Pova 6 Pro या फोनवर बंपर सवलत देण्यात आली आहे. 

फ्लिपकार्टवर Oneplus 12, Oneplus Nord CE 4, OnePlus 12R, OnePlus Nord 3 या मोबाईलवर बँक आणि एक्सचेंज ऑफर अशा सवलती दिल्या जात आहेत. 

फ्लिपकार्टवर iPhone 14 ची किंमत 55999 आणि iPhone 15 ची किंमतही मोठ्या फरकानं कमी करण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : छोट्या पडद्यावरील 'या' टॉपच्या अभिनेत्रींचे पती त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत? किती वर्षांचा फरक, जाणून घ्या

फ्लिपकार्टवर Pixel 7a फोन 31999 रुपयांना मिळत असून, Pixel 8 हा फोन 49,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. 

Poco M6 हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 7,999 रुपयांना मिळत आहे. 

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Motorola Edge 50 Pro ची सवलतीतील किंमत 27,999 तर, Moto Edge 40 Neo अवघ्या 19999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Moto G64 इथं Moto G64 रुपयांना उपलब्ध असून, Moto G34 ची किंमत 9999 रुपयांपर्यंत उतरली आहे.