PM Modi Mumbai: स्वराज्य आणि सुराज्य...डबल इंजिन सरकारमध्ये जनतेला पाहायला मिळलं, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

विकसित भारताच्या निर्माणासाठी आपली शहरांची भूमिका महत्वाची आहे.  येत्या 25 वर्षांत राज्यातील अनेक शहर देशांच्या विकासाला चालना देणार आहे. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच कामांना वेग दिला.

Updated: Jan 19, 2023, 07:24 PM IST
PM Modi Mumbai: स्वराज्य आणि सुराज्य...डबल इंजिन सरकारमध्ये जनतेला पाहायला मिळलं,  पंतप्रधान मोदींकडून कौतुक title=

PM Modi Visit Mumbai Live Updates : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. वांद्रे येथील बीकेसी ग्राऊंडवर (BKC Mumbai) जाहीर सभेत भव्य सभा झाली. भारताबाबत संपूर्ण जगभरात सकारात्मकता पहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेमुळे स्वराज आणि सुराज्य याची भावना या डबल इंजीन सरकारमध्ये पहायला मिळते असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी देखील या सभेत भाषण करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मुंबई महापालिकेच्या काभारावर बोट ठेवत अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर निशाणा साधला. 

पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. मुंबईच्या विकासासाठी मेट्रो, रस्ते सुधारणा तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण महत्वाचे आहे.  डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. मुंबईकरांच्या पैशाचा उपयोग योग्य रितीने झाला पाहिजे. या भ्रष्टाचार नको. मुंबईचा विकास थांबता कामा नये. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं घडलेलं कधीच स्वीकारल जाणार नाही. मुंबईचा विकास झाला पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकारची जोडी मुंबईकरांच्या सर्व अपेक्षा आणि त्यांची स्वप्न पूरण करेल. मधल्या काळात मुंबईतील विकासकामे थांबली होती. मात्र, शिंदे-फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकाने विकासाला गती दिली. मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. जनतेच्या हक्काचा पैसा बँकेच्या तिजोरीत राहिला तर विकास कसा होणार असा टोला देखील पंतप्रधान मोदींनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहिती आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.  आमच्या सरकारने अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना दिली. लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संधी दिल्यामुळे हे शक्य झाले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे. काही जणांनी मोदी मुंबईत येऊ नये असे वाटत होते असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगवला. बाळसाहेब ठाकरे आणि मोदी यांचे स्नेह संबंध होते. तसेच हिंदुत्त्वाबाबत दोन्हीची भूमिका एकच असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुन्हा एकदा गद्दारीचा उल्लेख

काही लोकांनी गद्दारी केली असे म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मोदींसमोर उद्धव ठाकरेंना टोला लगावला.  या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. 

एकनाथ शिंदेंनी राज्यासाठी एक लाख कोटींचे उद्योग आणले. हे डबल इंजिनचं सरकार राज्यात बदल घडवणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  20 वर्षे मुंबई पालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केली. 20 वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्या केवळ स्वतःची घरं भरली असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण झाले (Mumbai Metro Inaugration) तर मनपाच्या 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'च्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले.