राज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 22, 2017, 06:11 PM IST
राज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर title=

मुंबई : राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.

निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी ४ ते ८ सप्टेंबर २०१७ या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 

१३ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३०  ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. 

गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी ३.०० वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी २५ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.

जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या  

- पालघर- ८, 
- नाशिक- २२, 
- नंदूरबार- १, 
- अहमदनगर- ८, 
- पुणे- १, 
- औरंगाबाद- ४, 
- नांदेड- ४, 
- उस्मानाबाद- १, 
- जालना- ४०, 
- हिंगोली- १३, 
- यवतमाळ- ७, 
- चंद्रपूर- ४ 
- गडचिरोली- १.