भाजप आणि आरएसएसच्या भूमिकेशी माझा संबंध नाही- रामदास आठवले

रामदास आठवलेंनी दिलं स्पष्टीकरण

Updated: Dec 23, 2018, 08:24 PM IST
भाजप आणि आरएसएसच्या भूमिकेशी माझा संबंध नाही- रामदास आठवले title=

मुंबई : मी जरी भाजपसोबत असलो तरी माझा भाजपा आणि आरएसएसच्या भूमिकेशी संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडलेला नाही. भाजपसोबत केवळ माझी राजकीय युती आहे. ती देखील निवडणुकीपूरतीच असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. कल्याण येथील विठ्ठलवाडी बस डेपोजवळील गंगाधर पानतावणे साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या दुस:या दिवशीच्या पहिल्या सत्रत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी हा विधान केले.

माझा हातात आहे झेंडा निळा, त्यामुळे अनेकांच्या पोटात उठला आहे गोळा. अशी छोटीशी कविताही त्यांनी केली. सगळ्य़ांना विचारात घेऊन निर्णय घेतला आहे. यापुढेही सगळ्य़ांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल असे आठवले यांनी स्पष्ट केले.