रामदेव बाबांनी शोधलं पहिलं कोरोनावर आयुर्वेदिक औषध

३ दिवसांत कोरोनाबाधित रूग्ण बरा होणार 

Updated: Jun 23, 2020, 03:29 PM IST
रामदेव बाबांनी शोधलं पहिलं कोरोनावर आयुर्वेदिक औषध  title=

मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांनी मंगळवारी कोरोनावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधलं आहे. 'कोरोनिल' असं या औषधाचं नाव असून कोरोनाबाधितांना उपचारा दरम्यान हे औषध अत्यंत गुणकारी असल्याचं ते म्हणत आहेत. 

रामदेव बाबांनी दिलेल्या माहितीनुसार, या औषधाची दोन वेळा चाचणी झाली आहे. १०० लोकांवर या औषधाची चाचणी करण्यात आली आहे. ३ दिवसांत जवळपास १०० टक्क्यांपैकी ६९ टक्के रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह झाले आहेत. ७ दिवसांत कोरोनाबाधित रूग्ण १०० टक्के बरा झाला आहे. 

याबाबत योगगुरू रामदेव बाबा सांगतात की,'संपूर्ण जग आणि देश ज्या गोष्टीची वाट पाहत होते. त्याबाबत मी महत्वाची घोषणा निर्माण करतो की, कोरोनावर औषध मिळालं आहे. क्लिनिकल केस स्टडीमध्ये २८० कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामधील सगळ्या बाधितांची तब्बेत सुधारली आहे. '

पतंजली रिसर्च सेंटरमध्ये ट्रायल करण्यात आलं आहे. ९५ कोरोनाबाधितांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले आहेत. ३ दिवसात ६९ टक्के बाधित बरे झाले आहेत. ७ दिवसांत १०० टक्के रूग्ण बरे झाले आहेत.