घाटकोपर विमान दुर्घटनेचं कारण आलं समोर, पायलटचा शेवटचा संवाद हाती

पाहा काय होता पायलटचा शेवटचा संवाद

Updated: Jul 5, 2018, 10:40 AM IST
घाटकोपर विमान दुर्घटनेचं कारण आलं समोर, पायलटचा शेवटचा संवाद हाती title=

मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या विमान अपघातामागे खराब हवामान असल्याचं आता पुढे येतं आहे. पायलट आणि विमानतळवरील निंयत्रण कक्ष यांच्यात झालेल्या अखेरच्या संवादातून ही बाब पुढे आली आहे. कोसळलेलं विमान मुंबई विमातळाच्या दिशेनं वाशीच्या खाडीवर असताना वैमानिकाचा नियंत्रण कक्षाशी अखेरचा संपर्क झाला.नियंत्रण कक्षानं जूहूच्या विमानतळावर उतरण्यासाठीच्या सूचना वैमानिकाला दिल्या. त्यावर उत्तर देताना वैमानिकानं वातावरण खराब असल्याचं कळवलं होतं.

जुहूमधून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान घाटकोपरमध्ये कोसळलं होतं. पवनहंस विमानतळावर त्याचं लँडिंग होणार होतं. प्रशिक्षणाच्या निमित्तानं या विमानानं उड्डाण केलं गेलं होतं. या विमानाच्या उड्डाणाआधी विमानासमोर नारळ फोडण्यात आला, पेढे वाटण्यात आले. त्यानंतर या विमानानं उड्डाण केलं. पण अवघ्या काही क्षणांतच हे विमान कोसळलं. सी ९० नावाचं हे विमान २३ वर्षे जुनं होतं. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. विमानाला ब्लॅक बॉक्स देखील सापडला होता पण आता खराब वातावरणामुळे विमान कोसळल्याचं समोर येतं आहे.