घाटकोपरमध्ये निरूपम यांची सभा उधळली

संजय निरूपम यांनी अप्रत्यक्षपणे फेरीवाल्यांची पाठराखण केली होती, यानंतर नवी मुंबईत मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल्स उधळले होते.

Updated: Nov 25, 2017, 02:54 PM IST
घाटकोपरमध्ये निरूपम यांची सभा उधळली title=

मुंबई : घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांची सभा उधळून लावली आहे. घाटकोपरच्या नायडू कॉलनीत लक्ष्मी नगर येथील नाला बाधीत झोपडपट्टीबचाव आंदोलनासाठी संजय राऊत यांची सभा सुरु होती.

मनसैनिकांकडून स्टेजवर जाऊन गोंधळ

या सभेत मनसैनिकांनी स्टेजवर जाऊन गोंधळ घातला. या गोंधळ घालणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यत घेतलं आहे. फेरीवाल्यांच्या मुद्यावरून मनसे आणि संजय निरूपम यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे.

मनसे-काँग्रेसमध्ये जुंपलेली

मनसेने यापूर्वी देखील रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या, फेरीवाल्यांना हुसकावून लावलं होतं, त्यात मनसे पदाधिकाऱ्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण झाली होती.

तेव्हा संजय निरूपम यांनी अप्रत्यक्षपणे फेरीवाल्यांची पाठराखण केली होती, यानंतर नवी मुंबईत मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल्स उधळले होते.