संजय राऊत यांना PMLA कोर्टात हजर करणार; कोर्टात काय होऊ शकतं? वाचा

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीकडून नियमाप्रमाणे विशेष PMLA कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल.

मेघा कुचिक | Updated: Aug 1, 2022, 09:47 AM IST
संजय राऊत यांना PMLA कोर्टात हजर करणार; कोर्टात काय होऊ शकतं? वाचा title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीकडून नियमाप्रमाणे विशेष PMLA कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल. ईडी सखोल तपासासाठी संजय राऊत यांचा ताबा पुन्हा मागण्याची शक्यता आहे. 

संजय राऊत यांचे प्रकरण आतापर्यंत वकील विकास साबणे बघत होते. मात्र आज कोर्टमध्ये संजय राऊत यांची बाजू एखादे वरिष्ठ वकील मांडण्याची शक्यता आहे. तर ईडीकडून आतापर्यंत सर्व महत्वाच्या केसेसमध्ये ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर ऍड. अनिल सिंग हे ईडीकडून बाजू मांडण्याची दाट शक्यता आहे.

कोर्टात काय होऊ शकते ?
- मेडिकल टेस्टनंतर ईडी संजय राऊत यांना विशेष PMLA कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर करतील
- ईडीकडून संजय राऊत यांचा काही दिवसांसाठी रिमांड मागितला जाईल
- प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी रिमांडची गरज असल्याचा युक्तिवाद  ईडीकडून केला जाण्याची शक्यता
- संजय राऊत यांचे वकील रिमांडला विरोध करण्याची दाट शक्यता
- खोट्या केसमध्ये गोवले, पुरावे खोटे असा युक्तिवाद संजय राऊत यांचे वकील करण्याची शक्यता