निफ्टी ११ हजाराच्यावर, सेन्सेक्सचाही नवा रेकॉर्ड

शेअर बाजारात आज दमदार सुरूवात झाली, निफ्टीने ११ हजाराचा महत्वाचा टप्पा पार केला आहे,

Updated: Jul 12, 2018, 12:41 PM IST
निफ्टी ११ हजाराच्यावर, सेन्सेक्सचाही नवा रेकॉर्ड title=

मुंबई : शेअर बाजारात आज दमदार सुरूवात झाली, निफ्टीने ११ हजाराचा महत्वाचा टप्पा पार केला आहे, तर सेन्सेक्सने देखील आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सेन्सेक्सने ३६ हजार ५२७ चा नवा रिकॉर्ड केला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात 0.05 टक्क्यांपेक्षा जास्त तेजी दिसत होती.

असा वाढला शेअर बाजार

मिडकॅप आणि स्मालकॅप शेअरमध्ये देखील उत्साह दिसून आला आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.7 टक्केवर आला आहे. तर निफ्टीचा मिडकॅप १०० इंडेक्समध्ये 0.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसईचा स्मालकॅप इंडेक्स 0.6 वाढला आहे.

बीएसईचा ३० शेअर्सची प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 259 अंकांनी म्हणजे, 0.7 टक्के तेजीने, 36 हजार 524 ने वर आला आहे. तर एनएसईची ५० शेअर्सची प्रमुख इंडेक्स निफ्टी 79 अंकावर म्हणजेच, 0.7 टक्के वर आला आहे, निफ्टी ११ हजाराच्या वर गेला आहे.

कोणते शेअर्स वाढले, कोणते कमी झाले

पीएसयू बँक, फार्मा, मेटल, ऑटो, आईल अॅण्ड गॅस शेअर्समध्ये सर्वात जास्त जोर दिसून येत आहे. बँक निफ्टी जवळ-जवळ १ टक्के मजबूत होवून, २७ हजार 047 वर पोहोचला आहे. आयटी शेअर्समध्ये थोडा दबाव जरूर दिसून येत आहे.

बाजारात दिग्गज शेअर्समध्ये आयओसी, एचपीसीएल, बीपीसीएल, डॉ. रेड्डीज, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय महिन्द्रा एंड महिन्द्रा,  अदानी पार्टस, इन्फोसिस आणि वेदांता 2.1-0.2 टक्क्याने वाढले आहेत.

मिडकॅप शेअर्समध्ये एमआरपीएल, आयडीबीआय बँक, अमारा राजा बॅटरीज आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स 3.3-२ टक्के वाढले आहेत, तर मिडकॅपमध्ये टाटा पावर आणि अदानी पावरचे शेअर्स 1.2-1 ने खाली आले आहेत.

स्मॉलकॅप शेअर्समध्ये अशोक बिल्डकॉन, एमएसआर इंडिया, टाईम टेक्नो, एमपीएस आणि इलेक्ट्रोस्टील स्टील, 13.2-5 टक्के मजबूत झाले आहेत. स्मॉलकॅप शेअर्समध्ये वी-मार्ट रिटेल, जेबीएफ इंडस्ट्रीज, मनपसंद बेवरेजेज, संदेश आणि गुडरिक ग्रुप5-2.5 टक्के खाली आले आहेत.