राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी, शिंदे -फडणवीस सरकार देणार 1 लाख तरुणांना रोजगार

पाहा कोणत्या क्षेत्रात उपलब्ध होणार नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सामंजस्य करार 

Updated: Nov 16, 2022, 05:15 PM IST
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी, शिंदे -फडणवीस सरकार देणार 1 लाख तरुणांना रोजगार title=
संग्रहित फोटो

Shinde-Fadanvis Government : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी (Unemployed Youth) आताची महत्तावाची बातमी.  राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) देणार 1 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत (Skill Development Programme) रोजगार (Employment) उपलब्ध करुन देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राजभवन इथं आज राज्यपाल भगतसिंग कोशयारी (Bhagat Singh Koshyari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. 

गेल्या काही महिन्यात राज्यातील काही महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार बुडाले. विरोधकांनी यावरुन सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार आरोप केले. या आरोपांना उत्तर देण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकार सरसावलं आहे. राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता विभागाद्वारे राज्यात 1 लाख 20 हजार रोजगार निर्माण करण्यासाठीं MoU sign करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून कौशल्य विभागाचे अधिकारी काम करत आहे, संवेदनशील असा रोजगार हा विषय आहे, हाताला काम देणारे हात देखील निर्माण व्हावेत असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.  1 लाख 21 हजार लोकांना रोजगार मिळणार आहेत. राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी करण्यासाठी आम्ही हे करार करत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

गेल्या दोन तीन महिन्यात उद्योग राज्यबाहेर गेले असे आरोप केले जात आहेत. पण  पण कुठलाही उद्योग एक दोन महिन्यात जात नाही असा आरोप करत नजीकच्या काळात अनेक मोठे उद्योग राज्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गेल्या अडीच तीन महिन्यात मोठे उद्योजक राज्यात आले, अनेक धाडसी निर्णय आपलं सरकार घेत आहे, राज्याचा विकास करणारं हे सरकार असून अगोदर फक्त घोषणा व्हायच्या पण आता आम्ही हाताला काम देत आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा : 'सरकारनं बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा ताबा घ्यावा....' भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आम्ही फक्त आश्वासन देत नाही - देवेंद्र फडणवीस
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आमचा सर्वाधिक भर हा रोजगारावर आहे. पंतप्रधान मोदी यांनी 10 लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला, आम्ही देखली 75 हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. 

आता राज्यात 1 लाख पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळणार आहे, आम्ही सामंजस्य करार करून विसरणारे लोक नाहीत, जोवर आकडा पार होत नाही तोवर आमचा संपर्क तुमच्याशी राहणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. राज्यात 45 टक्के लोक रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत. तसंच अर्थ क्षेत्रात सेवा आणि उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. कौशल्य विकास त्यासाठी महत्त्वाचे साधन आहे,  उद्योग जगतात कुशल रोजगार मिळत नसल्याची अडचण असल्याने स्किल ट्रेनिंग देण्याचे काम करत आहे, उद्योजकांना या ट्रेनिंग सेंटरसोबत जोडण्याचा प्रयत्न, असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या?
सामंजस्य करारामुळे हॉस्पिटॅलिटी, बांधकाम, मीडिया अँन्ड एन्टरटेन्मेंट, रिटेल, बँकिंग, एव्हिएशन या क्षेत्रात प्रामुख्याने नोकऱ्या उपलब्ध होणार असून शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.