Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारवर संजय राऊत यांचा आक्षेप

राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्ता स्थापन झाल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे.

Updated: Jul 16, 2022, 08:20 PM IST
Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारवर संजय राऊत यांचा आक्षेप title=

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्ता स्थापन झाल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. विशेष म्हणजे या सरकारने मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसतानाही आठवड्याभरात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीत उस्मानाबाद, औरंगाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत मोठे निर्णय घेतले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्रिमंडळाबाबतचा मुद्दा धरुन आणि घटनेचा दाखला देत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांवर ट्विटद्वारे आक्षेप घेतला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सवालही विचारला आहे. (shiv sena mp and leader sanjay raut give objection over to state government cabinet decision without cabinet and give refrence to rule)

राऊतांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

"भारतीय राज्यघटनेच्या कलम 164  1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही.  गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही. राज्यपाल,हे काय सुरू आहे?", असा सवाल राऊतांनी ट्विटमधून केला आहे.

त्यामुळे आता संजय राऊतांनी घेतलेल्या या आक्षेपावरुन राज्य सरकारकडून काय उत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.