युतीचा अंतिम फॉर्म्युला संध्याकाळपर्यंत ठरण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीवर शिक्कामोर्तब?

Updated: Sep 30, 2019, 02:18 PM IST
युतीचा अंतिम फॉर्म्युला संध्याकाळपर्यंत ठरण्याची शक्यता title=
संग्रहित फोटो

मुंबई : घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. भाजपा १४६ जागा, शिवसेना १२४ जागा, तर १८ जागा मित्रपक्षांसाठी देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीवर संध्याकाळपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

आज संध्याकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. महायुतीच्या जागावाटपासाठी संयुक्त पत्रकार परिषद होण्याची शक्यता कमी असून संयुक्त निवेदन जाहीर करून आजच महायुतीची घोषणा होण्याची चिन्ह आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून युती होणार का? कोणाला किती जाणा लढवता येणार? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर आज युतीचा अंतिम फॉर्म्युला ठरवण्यात आल्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.