अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंची वेळ

सेना-भाजपतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी भेटीची वेळ मागितलीय. 

Updated: Apr 16, 2018, 09:18 AM IST
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंची वेळ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढलाय. या सेना-भाजपतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी भेटीची वेळ मागितलीय. 

आज संध्याकाळी मातोश्रीवर सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. युतीच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप भेट निश्चित नाही.

याआधीच भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असं  सेनेनं म्हटलं होतं. त्यामुळे या भेटीत नेमकं काय दडलंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.