मुंबईकरांनो पावसाचा आनंद घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक

Mumbai Local Megablock : आज पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. कारण आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे.   

नेहा चौधरी | Updated: Jul 2, 2023, 07:51 AM IST
मुंबईकरांनो पावसाचा आनंद घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक title=
sunday mega block timetable harbour line and central line central railway mumbai local news

Local Megablock on 2 July Sunday : बाहेर मस्त पाऊस पडतोय अशात आजचा सुट्टीचा दिवस तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर मुंबईकरांनो आधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. अन्यथा एन्जॉय करण्याऐवजी तुमचे नाहक हाल होतील. कारण आज मध्य आणि हार्बर मार्गावर मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबईकरांची लाइफलाइनवर दर रविवारी विविध अभियांत्रिकी कामासाठी आणि देखभालीसाठी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलच्या वेळापत्रकानुसार तुमचं नियोजन करा.  (sunday mega block timetable harbour line and central line central railway mumbai local news)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) वरुन सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल वळविण्यात आल्या आहेत. या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावरुन धावणार आहेत.या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबणार आहेत. त्यानंतर मुलुंड स्थानकानंतर लोकल पुन्हा धिम्या मार्गावरुन धावणार आहे.

लोकलच्या दररोजच्या नियोजित वेळेसुरु आज मध्य रेल्वेवर लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने धावणार आहेत. 

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 

तुम्ही हार्बर मार्गाने प्रवास करणार असाल तर आज पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर लोकल धावणार नाही. आज सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक आहे.
 
पनवेल (Panvel)मधून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे मुंबईतून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावर एकही लोकल धावणार नाही. 
 
पनवेल (Panvel)मधून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत  सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरही एकही लोकल धावणार नाही. तर ठाण्यातून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आज रद्द असणार आहे.

मात्र प्रवाशांची गैरसोय होऊन नयेत म्हणून मेगब्लॉक दरम्यान मुंबई वाशी दरम्यान विशेष लोकल आज धावणार आहेत. तर ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईनही विशेष लोकलची सेवा असणार आहे. त्याशिवाय बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.