डोंबिवलीच्या गुढीपाडवा उत्सवाबाबत मोठी अपडेट! गणेश मंदिर संस्थानाचा महत्वपूर्ण निर्णय

अनेक वर्षांची परंपरा असलेल्या गणेश मंदिराच्या नववर्ष स्वागत यात्रेला यंदा ब्रेक लागला आहे.

Updated: Apr 11, 2021, 11:35 AM IST
 डोंबिवलीच्या गुढीपाडवा उत्सवाबाबत मोठी अपडेट! गणेश मंदिर संस्थानाचा महत्वपूर्ण निर्णय title=

डोंबिवली : कोरोना संसर्गामुळे संपूर्ण राज्याला विळखा घातल्यामुळे अनेक सण उत्सव गेल्यावर्षीपासून बंद आहेत. डोंबिवलीतील गुढीपाडवा उत्सव प्रसिद्ध आहे. या उत्सवावर यंदा देखील विरजन पडले आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या गणेश मंदिराच्या नववर्ष स्वागत यात्रेला यंदा ब्रेक लागला आहे.

 गुढीपाडव्याला राज्यात सर्वच ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. याच स्वागत यात्रेची सुरवात डोंबिवली मधून झाली. डोंबिवली मधील प्रसिद्ध श्री.गणेश मंदिर संस्थान ही या स्वागत यात्रेचे आयोजन दरवषी करत असते.
 
 कोरोनामुळे मागच्या वर्षी नववर्ष स्वागत यात्रा रद्द करण्यात आली होती. तर यावर्षीही वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदाची नववर्ष स्वागत यात्रा रद्द केल्याची माहिती अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली आहे.
 
  मंदिरात धार्मिक कार्यक्रम अंत्यत कमी लोकांच्या उपस्थित आणि कोरोनाचे नियम पाळून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं.