उद्या आंदोलन होणारच; रेल्वे पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही मनसे ठाम

 रेल्वे पोलिसांची नोटीस आली असली तरी सोमवारी आंदोलन होणार- संदीप देशपांडे

Updated: Sep 20, 2020, 12:40 PM IST
उद्या आंदोलन होणारच; रेल्वे पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही मनसे ठाम title=
संग्रहित फोटो

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी रेल्वे सुरु करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करणार असल्याचं सांगतिलं. याबाबत रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडेंना आंदोलन न करण्याची नोटीसद्वारे सूचना केली आहे. आंदोलन केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र रेल्वे पोलिसांची नोटीस आली असली तरी सोमवारी आंदोलन होणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. 

रेल्वे पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊनही मनसे आपल्या निर्णयावर ठाम आहे. कायदेशीर कारवाईला आम्ही तयार असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. शिवसेनेची आंदोलन झाली, त्यांना नोटीसा नाही, मात्र आम्हाला लगेच नोटीस देण्यात आली ही दडपशाही असल्याचंही ते म्हणाले. 

मुंबईत लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी उद्या मनसेचा सविनय कायदेभंग

 

आठ तास ड्युटी आणि आठ तास प्रवास असे लोकांचे हाल सुरु आहेत हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? अनिल परब एसटी 100 टक्के चालू करत आहेत. कोरोनाने अनिल परब यांच्या कानात सांगितलं आहे का की, एसटी सुरु झाल्यास कोरोना होणार नाही आणि रेल्वे सुरु झाल्यास होणार, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.