Mumbai Local News : कर्जत, आसनगाव, बदलापूरवरून लोकलनं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी

Mumbai Local News : मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी. हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रभावित होणार... 

Updated: Feb 20, 2023, 09:30 AM IST
Mumbai Local News : कर्जत, आसनगाव, बदलापूरवरून लोकलनं  मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी  title=
Vande bharat Train affetcs on Mumbailocal time table latest Marathi news

Mumbai Local Latest News : (Mumbai Local) मुंबई लोकलनं दर दिवशी हजारोंच्या संख्येनं नागरिक प्रवास करतात. इच्छित स्थळी पोहोचतात. किमान वेळात अपेक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या या लोकलमध्ये कार्यालयीन वेळांमध्ये खच्चून गर्दीही पाहायला मिळते. अशा या लोकलनं प्रवास करत पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी निघणाऱ्या किंवा सातत्यानं रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

(CSMT) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते शिर्डी (Shirdi) आणि सीएसएमटी ते सोलापूर (Solapur ) काही दिवसांपूर्वीच 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू झाली. खुद्द पंतप्रधानांनी  या वेळी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. अतिशय कुतूहलपूर्ण अशा या प्रवासाची सुरुवात झालेली असतानाच या दोन्ही एक्स्प्रेसमुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला मात्र प्रभावित केलं आहे. 

नव्यानं सुरु झालेल्या ‘वंदे भारत’मुळे 16 मेल- एक्स्प्रेस, (Pune) पुण्यातील 6 उपनगरीय लोकल आणि पुण्यातील एका डेमूच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता त्यामागोमागच आता लोकलच्या वेळापत्रकही बदल करण्यात आल्याचं कळत आहे. ज्यामुळं आता वंदे भारतसाठी स्वतंत्र रूळ नसल्यामुळं इतर रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. 

लोकलचं वेळापत्रक बदललं?

शिर्डीच्या दिशेनं जाणाऱ्या ‘वंदे भारत’मुळं डाऊन लोकल आणि सोलापूरहुन येणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे अप लोकलचं वेळापत्रक आता बदललं आहे. ज्यामुळं कर्जत (Karjat Local), कसारा (Kasara Local), आसनगाव (Asangaon), बदलापूर (Badlapur), अंबरनाथ (Ambarnath), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan) मार्गांवरील 15 डबा लोकल वेळापत्र कोलमडलं आहे. असं असलं तरीही अद्याप लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला नसल्याचं (Central Railway) मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला इशारा पाहून वेळीच सावध व्हा!

 

दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करत असताना या रेल्वेला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सीएसएमटी – शिर्डी, ‘वंदे भारत’ गाडीसाठी पहिल्याच आठवडय़ात 100 टक्के आरक्षण झालं होतं. पण, प्रवास करताना काही प्रवाशांनी मात्र इथं मिळणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी नाराजीचा तीव्र सूर आळवला होता. थेट सोशल मीडियावर माहिती देत काही प्रवाशांनी निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ दिल्याची माहिती उघडकीस आली होती. ज्यानंतर रेल्वे विभागाकडून याबाबत तातडीनं पावलंही उचलली गेली होती.