VIDEO : चक्क आजीने तरूणाला असं फसवलं.... सगळीकडे होतेय चर्चा

आजीने तरूणासोबत जे केलंय ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का 

Updated: Jun 26, 2021, 11:15 AM IST
VIDEO : चक्क आजीने तरूणाला असं फसवलं.... सगळीकडे होतेय चर्चा  title=

मुंबई : सोशल मीडियावरचे व्हिडिओ अनेकांना आश्चर्यचकित करतात. या व्हिडिओतून नवनव्या गोष्टी शिकल्या जातात. सध्या सोशल मीडियावर चक्क आजीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. याला कारण देखील तसंच काहीसं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 

या व्हिडीओमध्ये एका आजीबाईने चांगलंच डोकं लावलं आहे. यामध्ये आजीबाईने एक प्लास्टिकचे टोपले घेतलेले आहे. हे टोपले आजीबाईने घराच्या छताला लावलेले असून त्याला एका लोखंडी रॉडने पकडले आहे. त्यानंतर व्हिडीओतील आजीने मदतीसाठी तरूणाला हाक दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

आवाज दिल्यानंतर थोड्या वेळाने एक तरुण घरातून आला आहे. त्याने आजीला मदत म्हणून छताला लावलेले प्लास्टिकचे टोपले पकडले आहे. नातवाने टोपले पकडल्यानंतर आजीबाई झरझर खाली उतरली आहे. खाली उतरताच प्लास्टिकचे टोपले धरून ठेवलेल्या नातवाच्या खिशावर आजीने डल्ला मरला आहे.

आजीबाईने तरूणाच्या खिशातून मोबाइल फोन आणि काही रोख रक्कम काढली आहे. तसेच त्या वस्तूला बॅगमध्ये टाकून ही आजी पसार झाली आहे आणि बिचारा तरुण तसाच ताटकळत उभा आहे. दरम्यान, आजीबाई आणि तरुणाने हा व्हिडीओ शूट करुन त्यांच्या समाजमाध्यवरील अकाऊंटला शेअर केला आहे. या मजेशीर व्हि़डिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.