'कोसळलेल्या गोखले पुलाची जबाबदारी रेल्वेची... पालिकेची नाही'

अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग कोसळलाय

& Updated: Jul 3, 2018, 01:18 PM IST

मुंबई : 'गोखले पुलाच्या डागडुजीची जबाबदारी पालिकेची नव्हतीच... डागडुजीसाठी पालिका पैसे देते... ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहेट, अशी प्रतिक्रिया मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिलीय. सोबतच, पुलाची डागडुजी व्यवस्थित झाली नाही, असा आरोपही महाडेश्वर यांनी केलाय.

हा पूल रेल्वे प्रशासनांतर्गत येतो... तो मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येत नाही, असं विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटलंय. मंगळवारी सकाळीच अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग कोसळलाय. कोसळलेला सिमेंटचा भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यामुळे त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला दिसतोय. या घटनेत पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रुळावरील ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

अधिक वाचा - अंधेरी दुर्घटना : मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली

घटनास्थळी एनडीआरएफ, आरपीएफ, फायरब्रिगेड, डिझास्टर कंट्रोलची टीम घटनास्थळी दाखल झालीय. ढिगाऱ्याखाली आणखीन नागरिक अडकले आहेत का? याची चाचपणी मदत यंत्रणा करत आहे.

अधिक वाचा : अंधेरी दुर्घटना : महापालिका आणि रेल्वे प्रशासनात 'ब्लेम गेम'