मुंबईत दूध टंचाई टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने कसली कंबर

Updated: Jul 17, 2018, 08:03 PM IST

मुंबई : राज्यात दुधाचं आंदोलन सुरू असताना मुंबईत टंचाई जाणवू नये, म्हणून पश्चिम रेल्वेनं कंबर कसलीये. प्रत्येकी ४४ हजार लिटर क्षमतेच्या १२ टँकर्समधून दुधाचा पुरवठा करण्यात येणार असून यातला पहिला टँकर शहरात दाखल झालाय. 

गुजरातमधून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना हे टँकर जोडले जाणार आहेत. अहमदाबाद- मुंबई सेंट्रल पॅसेंजर ट्रेनला दररोज एक  ४४ हजार लीटर क्षमतेचा टँकर जोडण्यात येणार आहे.  अहमदाबादच्या नॅशनल डेअरी मधून हे दूध मुंबईसाठी पाठवण्यात येत आहे. 

आंदोलन चिघळणार? 

दूध आंदोलनाबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेली बैठक निष्फळ ठरलीय. मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत सरकारला तोडगा काढण्यात अपयश आलं. त्यामुळे पुन्हा दोन दिवसांनी म्हणजे १९ जुलैला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.