पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉक रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ब्लॉकच्या त्रासातून सुटका 

Updated: Nov 11, 2018, 08:39 AM IST
पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉक रद्द  title=

मुंबई : रविवारच्या दिवशी घरातून बाहेर पडताना प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक बघाव लागतं. रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीसाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. आजच्या दिवशी मेगाब्लॉक संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉक रद्द करण्यात आलाय. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ब्लॉकच्या त्रासातून सुटका होणार आहे.

लोकल फेऱ्यांना विशेष थांबा 

रात्रकालीन ब्लॉक पूर्ण झाल्यानं हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही रविवारी दिवसभर ब्लॉकचा त्रास सहन करावा लागणार नाही.

मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण डाऊन जलद मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक काळातील काही लोकल फेऱ्यांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर विशेष थांबा देण्यात आलाय.