हिमांशू रॉय यांनी का केली आत्महत्या, हे आहे कारण ?

आयपीएस अधिकारी आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी स्वत:च्या तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली.  

Updated: May 11, 2018, 03:16 PM IST
हिमांशू रॉय यांनी का केली आत्महत्या, हे आहे कारण ?  title=

मुंबई : आयपीएस अधिकारी आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी स्वत:च्या तोंडात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी मुंबईतील मंत्रालयासमोरील सुरुची या शासकीय इमारतीतील निवासस्थानी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालेय. दरम्यान, दीड वर्षांपासून हिमांशू रॉय हे आजारपणामुळे रजेवर होते. त्यामुळे ते असवस्थ होते. त्यांनी महागडे उपचार सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा परदेश वाऱ्याही केल्या. मात्र, ते खूप निराश झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यांचा पोलीस दलात दबदबा होता. त्यांनी अतिरीक्त पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहिले आहे.  हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलाला मोठा हादरा बसलाय. ते 
 गेल्या काही वर्षांपासून हाडांच्या कॅन्सरने त्रस्त होते. त्यांनी या आजारावर परदेशात जाऊन उपचार घेत होते. ते मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आणि एटीएस प्रमुख होते. त्यांनी असे टोकाचे पाऊल उचल्याने अनेकांना धक्का बसलाय.

हिमांशू रॉय यांनी अनेक मोठे आणि गुंतागुंतीचे गुन्हे देखील बाहेर आणले. आयपीएल बेटिंग-ललीत मोदी प्रकरण, जे डे हत्या प्रकरण हिमांशू रॉय यांनी उघड केली आहे. हिमांशू रॉय अनेक खटल्यात जातीने लक्ष घातले होते. हिमांशू रॉय हे बॉडीबिल्डर ऑफिसर होते, शरीर यष्टीने अतिशय फिट असे हिमांशू रॉय होते. हिमांशू रॉय आपल्या शेवटच्या काळात अतिशय हतबल झाले होते, असे सांगण्यात येत होते.