राष्ट्रवादी महिला पदाधिकारीसह पती विरोधात गुन्हा दाखल

मुलुंडमध्ये महिलेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आणि तिचा पोलीस निरिक्षक असलेल्या पतीविरोधात गुन्हा दाखल झालाय. एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 24, 2017, 10:42 PM IST
राष्ट्रवादी महिला पदाधिकारीसह पती विरोधात गुन्हा दाखल title=

मुंबई : मुलुंडमध्ये महिलेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आणि तिचा पोलीस निरिक्षक असलेल्या पतीविरोधात गुन्हा दाखल झालाय. एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.

महिलेची  गळफास लावून आत्महत्या

मुलुंड पश्चिममध्ये रिया पालांडे या महिलेनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी आणि राष्ट्रवादीची पदाधिकारी असलेली त्यांची पत्नी भारती चौधरी तसंच त्यांची मुलगी नीलाक्षी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आला आहे. 

चौधरी कुटुंबाला अटक होण्याची शक्यता

या प्रकरणात आता लवकरच चौधरी कुटुंबाला अटक होण्याची शक्यता आहे. रिया पालांडे या महिलेनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी या महिलेने घराच्या भिंतीवर भारती चौधरी आणि तिचे कुटुंब तिच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे लिहिलं होतं. 

पैशांच्या देवाणघेवाणीतून बदनामी?

पैशांच्या देवाणघेवाणीतून आपल्याला वारंवार चौधरी कुटुंब त्रास देत होतं आणि आपली बदनामी करीत होतं. यामुळे आपण आत्महत्या केल्याचं रिया यांनी डायरीतही लिहून ठेवलं आहे. भारती चौधरी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. नवघर पोलीस ठाणे याचा तपास करीत आहेत.