लोकलमध्ये तरूणीसमोर तरूणाचे हस्तमैथुन

मुलुंडला राहणारी २२ वर्षीय तरुणी दुपारी २ च्या सुमारास बोरीवली-चर्चगेट ट्रेननं प्रवास करत होती. तिला मुलुंडला जाण्यासाठी दादर स्थानकावल उतरायचे होते. 

Updated: Jul 10, 2017, 09:43 PM IST
लोकलमध्ये तरूणीसमोर तरूणाचे हस्तमैथुन  title=

मुंबई : मुंबई लोकलमध्ये एका तरूणीला सर्वात वाईट अनुभव आला, तिने याबाबतीत रेल्वेच्या हेल्पलाईनला तक्रार केली, हेल्पलाईननेही हसण्यावर वेळ मारून नेली. मात्र जेव्हा संबंधित तरूणीने या प्रकरणातील तरूणाचा फोटो फेसबुकवर शेअर करत, घडलेली घटना लिहिली. तेव्हा रेल्वेला जाग आली.

मुलुंडला राहणारी २२ वर्षीय तरुणी दुपारी २ च्या सुमारास बोरीवली-चर्चगेट ट्रेननं प्रवास करत होती. तिला मुलुंडला जाण्यासाठी दादर स्थानकावल उतरायचे होते.

महिलांकरता असलेल्या नवव्या डब्यात ती बसली होती. सोबत ६ महिला प्रवासी होत्या. शेजारच्या अपंगांच्या डब्यातून प्रवास करणारा एक इसम तिच्याकडे रोखून पाहात होता. तिने आणि शेजारी बसलेल्या मुलीनेही हेडफोन लावले होते. त्यामुळे तो काय बोलत होता ते कळले नाही. 

आवाज लहान केल्यावर तिला कळलं की तो तिच्याकडे नजर रोखत तिला शिवी देत होता. पाच-सहा वेळा त्याने तिला शिवी दिली. त्याचा हात रेलिंगमधून महिलांच्या डब्यात तिच्यासमोर बसलेल्या महिला प्रवाशाच्या चेहऱ्यापर्यंत येत होता. यानंतर मात्र तिच्याकडे रोखून पाहत तिच्यादेखतच पँटची झिप उघडून हस्तमैथुन करायला सुरुवात केली.

ट्रेन कांदिवलीला येताच तो अपंगांच्या डब्यातून उतरून महिलांच्या डब्याच्या दिशेने येऊ लागला. यानंतर महिला प्रवाशांनी आरडाओरडा केला. या तरूणाने या तरूणीवर बलात्कार करण्याची धमकी दिली. महिलांच्याआरडाओरड्याने तो पळून गेला.