पी. चिदंबरमांचा खटला सुरूच ठेवा- कोर्ट

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विजयाला आव्हान देणारा खटला सुरूच राहणार आहे. चिदम्बरम यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्यानं याचिका फेटाळण्याचा प्रश्नच येत नसल्याचा निर्णय देत मद्रास हायकोर्टानं चिदम्बरम यांना झटका दिला आहे.

Updated: Jun 7, 2012, 12:41 PM IST

www.24taas.com, चेन्नई

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विजयाला आव्हान देणारा खटला सुरूच राहणार आहे. चिदम्बरम यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्यानं याचिका फेटाळण्याचा प्रश्नच येत नसल्याचा निर्णय देत मद्रास हायकोर्टानं चिदम्बरम यांना झटका दिला आहे.

त्यामुळं चिदंबरम यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. २००९च्या शिवगंगा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत चिदंबरम यांनी विजय मिळवला होता. मात्र अण्णा द्रमुकचे उमेदवार राज कन्नप्पन यांनी त्यांच्या विजयाला आव्हान दिलं होतं.

मतदान प्रक्रियेदरम्यान चिदंबरम यांनी हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. तसंच त्यांच्या विरोधात मद्रास हायकोर्टात याचिकाही केली. त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टानं खटला सुरूच ठेवण्याचा निर्णय दिला आहे.