एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट और एन्टरटेन्मेंट

फिल्म सिर्फ तीन चिजोंसे बनी है.. एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एल्टरटेन्मेंट...सिनेमा एंन्टरेनिंग झाला...ग्लॅमरस झाला.. 100 कोटींची मॅजिकल फिगर लीलया पार करु लागला.. ग्लोबल सिनेमा विषयी थोडसं....

Updated: May 3, 2012, 09:53 PM IST

1990-2012

 

फिल्म सिर्फ तीन चिजोंसे बनी है..  एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट और एन्टरटेन्मेंट...सिनेमा एंन्टरेनिंग झाला...ग्लॅमरस झाला.. 100 कोटींची मॅजिकल फिगर लीलया पार करु लागला.. ग्लोबल सिनेमा विषयी थोडसं....

 

ये जमाना है मोहोब्बत का...या शब्दात ज्याचं वर्णन करता येईल तो काळ म्हणजे 90 चं दशक...या दशकाची सुरुवात झाली तीच मुळी आशिकी या रोमॅण्टिक सिनेमाने...तरुणाईच्या तोंडी या या सिनेमातली गाणी तर रूळलीच पण या फ्रेश कपलने बॉलिवूडला लव्हस्टोरीजची ओढ लावली....यानंतर हम आपके है कौन,दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यांसारख्या एकापेक्षा एक सिनेमांनी बॉक्सऑफीसची सगळी रेकॉर्ड्स मोडली आणि हिंदी सिनेमा देशाच्या कक्षा ओलांडून आंतरराष्ट्रीय ख्यातीकडे आकर्षित झाला तो याच काळात...

 

सलमान खान,शाहरूख खान आणि आमीर खान या तिन्ही खाननी बॉलिवूडवर ख-या अर्थानं राज्य केलं..नायक आणि खलनायक यांतली सीमारेषाही याच दशकात अस्पष्ट होत गेली...बाजीगर,खलनायक या सिनेमांमधून स्टार्स खलनायकाच्या रुपातही भाव खाऊन गेले...तर कॉमेडी सिनेमांची लाटही याच काळात आली...अंदाज अपना अपनामधील सलमान-आमीरच्या जोडीने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं तर गोविंदाच्या हलक्याफुलक्या कॉमेडीने प्रेक्षकांना टेन्शन फ्री राहण्याचा मंत्र दिला.

 

रोमान्स,कॉमेडी,एक्शन,फॅमिली ड्रामा यांनी पुरेपुर भरलेल्या हिंदी सिनेमाला नवीन कथानकं...नवीन तंत्र आकर्षित करू लागली...21 व्या शतकाकडे बॉलिवूडनंही झेप घेतली ती सर्व अर्थाने परफेक्ट होण्यासाठी...हॉलिवूडने प्रेरित होऊन बॉलिवूडमध्येही अनेक प्रयोग पाहायला मिळाले...मग सायन्स फिक्शन असेल किंवा परदेशातली लोकेशन्स असतील...बिग बजेट सिनेमांची शृंखलाच सुरु झाली..स्टार्स सुपरस्टार्स झाले ते त्यांच्या भरगच्च मानधनाच्या आकडेवारीने...सलमान-आमीर-शाहरूख या स्टार्सने प्रत्येक सिनेमा सुपरहिट होण्यासाठी चंग बांधला..

तर नायिकादेखील मागे नव्हत्या...माधुरीपाठोपाठ काजोल, करिना, ऐश्वर्या, कतरिना यांनीही हम भी कुछ कम नही हेच दाखवून दिलं...झिरो फिगर मिरवत करिनाने सर्वांनाच घायाळ केलं...तर विद्या बालनने डर्टी होत झिरो फिगरला विसरायला लावलं...सिनेमा फक्त अभिनेत्याच्या नावावर नाही चालत तर अभिनेत्रीच्या नावावरही सुपरहिट होऊ शकतो हे विद्यानं दाखवून दिलं.आयटम नंबर्सच्या लाटेत मोठमोठ्या अभिनेत्रींनी उड्या घेतल्या आणि मुन्नी,शीला,अनारकलींनी प्रेक्षकांना सिनेमागृहातही थिरकायला लावलं.

 

दबंग, सिंघम या सिनेमांनी दाक्षिणात्य स्टाइल स्विकारत नव्या एक्शनचा सिलसिला सुरु केला तर थ्रीडी तंत्राने सज्ज होत शाहरूखच्या रा-वनने बॉलिवूडला टेक्निकली परफेक्ट व्हायला भाग पाडलं.हिंदी सिनेमा हा फक्त मनोरंजनापुरता मर्यादीत राहिला नाही तर हिंदी सिनेमाकडे व्यवसाय म्हणून पाहिलं जाऊ लागलं...जितकं बजेट जास्त तितकी चर्चा जास्त असं जणू समीकरणच झालं...सिनेमा भारतात किती चालला यापेक्षा परदेशात किती चालला याच्या चर्चा अधिक होऊ लागल्या..

 

हटके प्रमोशनच्या युक्त्या शोधत सिनेमांनी बॉक्सऑफीसवर 100 कोटींसारखी मॅजिकल फिगरही लीलया पार केली..बॉलिवूड आणि हॉलिवूड यांतली सीमारेषा पुसट व्हावी यासाठीच आता निर्माते-दिग्दर्शक प्रयत्नशील दिसतायत..बॉलिवूडचं हे ग्लोबल रूप निश्चितच आशादायी आहे...100 वर्षाच्या दैदिप्यमान इतिहासात भारतीय सिनेमाने आपली नोंद जगाला घ्यायला लावली हे चित्र अभिमानास्पद आहे यात शंकाच नाही.

 

 

 

 

Tags: