जॉनच्या आयुष्यात प्रिया रुंचाल नावाचे 'भूचाल'

बिपाशा बसू बरोबर असलेली नऊ वर्षांची लिव-इन-रिलेशनशिप मधून वेगळं झाल्यानंतर आता जॉन अब्राहाम बोहल्यावर चढणार आहे. बिपाशा बसूबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या देखण्या तरुणीचे नाव आहे प्रिया रुंचाल.

Updated: Dec 18, 2011, 12:25 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

बिपाशा बसू बरोबर असलेली नऊ वर्षांची लिव-इन-रिलेशनशिप मधून वेगळं झाल्यानंतर आता जॉन अब्राहाम बोहल्यावर चढणार आहे. बिपाशा बसूबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या देखण्या तरुणीचे नाव आहे प्रिया रुंचाल.

जॉन प्रियाच्या बाबतीत खुपच सिरीयस आहे आणि लवकरच तो आपल्या लग्नाची घोषणा करेल अशी चिन्हं असल्याचं सूत्रांचे म्हणणं आहे. जॉन येत्या एप्रिलमध्ये साखरपूडा करेल आणि त्यानंतर २०१२ च्या अखेरीस विवाहबंधनात अडकेल असं त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणं आहे. ३८ वर्षाचा जॉनचे बिपाशा बिपाशासोबत एकनिष्ठ राहिला नाही अशा चर्चेला उधाण आलं होतं. आणि त्यानंतर त्याने ब्रेकअपचा झटका बिपाशाला दिला. जॉनची नवी गर्लफ्रेंड फायनानशियल ऍनालिस्ट आहे आणि तिचं वय २६ वर्षे आहे.

बॉलिवूडच्या कचकड्या दुनियेत जॉन आणि बिपाशा नऊ वर्षे एकत्र राहिले आणि त्यानंतर वेगळे झाले यात काहीच नवल नाही. आता बिपाशानेही नवा जोडीदार राणा डग्गुबाटी शोधला आहे. अर्थात एकेकाळी बॉलिवूडचं हॉट कपल म्हणून जॉन आणि बिपाशा ओळखले जात त्या प्रेमाची अखेर सुखांतिकेत झाली नाही.