'दुभंग' आणि 'स्वराज्य' सज्ज

या शुक्रवारी रिलीज झालेल्या 'दुभंग' आणि 'स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे' या दोन्ही सिनेमांचे प्रीमिअर गुरुवारी मुंबईत पार पडले.

Updated: Nov 11, 2011, 02:19 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

या शुक्रवारी रिलीज झालेल्या 'दुभंग' आणि 'स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे' या दोन्ही सिनेमांचे प्रीमिअर गुरुवारी मुंबईत पार पडले.

 

महेश कोठारे दिग्दर्शित दुभंग या सिनेमाचा प्रीमिअर शुक्रवारी पार पडला. एका बॉक्सरचा संघर्ष पडद्यावर रेखाटण्यात आला 'दुभंग'मध्ये. महेश कोठांरे यावेळी खूप आनंदी होते. तर उर्मिला आणि आदिनाथ या रियल लाईफ कपलचा हा पहिलाच सिनेमा असल्यानं त्यांच्याही आनंदाला एक रोमँन्टिक किनार होती.

 

दुसरीकडे स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे या सिनेमाच्या प्रीमिअरलाही सिनेमाच्या टीमनं हजेरी लावली. कलाकारंबरोबरंच प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी बरीच गर्दी केली होती. 'दुभंग' आणि 'स्वराज्य' या  दोन बहूचर्चित फिल्मस एकाच दिवशी रिलीज होत असल्यांनं मराठी रसिकांमध्येही उत्साहाचं वातावरण होतं.