रजनीकांतही 'मादाम तुसाँ'मध्ये?

सुपरस्टार रजनीकांत यांच्या मेणाचा पुतळा लवकरच जगप्रसिध्द 'मादाम तुसाँ' म्युझिअममध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे. एका ऑनलाईन कॅम्पेनद्वारे रजनीकांतचे फॅन्स मादाम तुसाँला याबाबत विनंती करणार आहेत.

Updated: Dec 13, 2011, 10:59 AM IST

झी २४ तास वेब टीम, चेन्नई

 

सुपरस्टार रजनीकांत यांच्या मेणाचा पुतळा लवकरच जगप्रसिध्द 'मादाम तुसाँ' म्युझिअममध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे. एका ऑनलाईन कॅम्पेनद्वारे रजनीकांतचे फॅन्स मादाम तुसाँला याबाबत विनंती करणार आहेत.

 

मादाम तुसाँद या म्युझिअममध्ये मेणाच्या रुपात जगभरातले सेलिब्रिटी मोठ्या दिमाखात उभे राहिले. या ग्लोबल यादीत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, सलमान खान आणि हृतिक रोशन हे बॉलिवूड स्टार्सदेखिल मेणाच्या रुपात या म्युझिअममध्ये अवतरले. या म्युझिअममध्ये मानाचं स्थान मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि हीच इच्छा रजनीकांत यांच्या फॅन्सचीदेखील आहे. त्यामुळेच एका ऑनलाईन कॅम्पेनद्वारे रजनीकांतचे फॅन्स मादाम तुसाँला याबाबत विनंती करणार आहेत.

 

रजनीकांत यांची लोकप्रियता, त्यांच्या सिनेमांना मिळणारे यश हे केवळ अद्भुत. कोणी कल्पनाही करू शकत नाही ऐवढं बॉक्स ऑफीस कलेक्शन त्यांच्या फिल्मला मिळतं. त्यामुळेच या सुपरस्टारचाही मेणाचा पुतळा मादाम तुसाँदमध्ये मोठ्या दिमाखात उभा राहावा हीच इच्छा सध्या त्यांचे फॅन्स मनोमनी व्यक्त करतायत आणि त्याप्रमाणे ते प्रयत्नशीलही आहेत. आता जर रजनीकांत यांच्या फॅन्सची ही इच्छा पूर्ण झाली तर रजनीकांत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरही रजनीकांत यांच्या प्रसिद्धीत भरच पडेल हे नक्की. तेव्हा आता रजनीकांत मेणाच्या रुपात मादाम तुसाँमध्ये कधी दाखल होणार याची वाट पाहुया.