‘टायगर’चा भार प्रेक्षकांच्या खिशावर

अभिनेता सलमान खानच्या फॅन्समध्ये त्याच्या आगामी ‘एक था टायगर’ चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. तुम्हीही यामध्ये सामील असाल तर खिशाला ढील देण्याची थोडी तयारी ठेवा... कारण मल्टिप्लेक्स मालकांनी ‘एक था टायगर’च्या तिकिटांची किंमत वाढवण्याचा एकमुखानं निर्णय घेतलाय.

Updated: Aug 9, 2012, 05:22 AM IST

www.24taas.com, मुंबई 

अभिनेता सलमान खानच्या फॅन्समध्ये त्याच्या आगामी ‘एक था टायगर’ चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. तुम्हीही यामध्ये सामील असाल तर खिशाला ढील देण्याची थोडी तयारी ठेवा... कारण मल्टिप्लेक्स मालकांनी ‘एक था टायगर’च्या तिकिटांची किंमत वाढवण्याचा एकमुखानं निर्णय घेतलाय.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची पुन्हा एकदा चित्रपटातून केमिस्ट्री पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. 15 ऑगस्टला ‘एक था टायगर’च्या निमित्तानं ती पूर्णही होणार आहे. पण, सलमानच्या या चित्रपटाचा भार मात्र प्रेक्षकांच्या खिशावर पडणार आहे. ‘एक था टायगर’च्या तिकिटांची ऑनलाईन विक्री लक्षात घेऊन देशभरातल्या मल्टिप्लेक्सनं तिकिटांची किंमत 12 ते 16 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रत्येक तिकिटामागे कमीत कमी 20 रुपयांनी वाढ होणार आहे.

तिकिटांच्या किंमतीत वाढ होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दिवाळी आणि नव्या वर्षाच्या मुहूर्तावर इतर दिवसांपेक्षा तिकिटांच्या किंमतीत वाढ करून तिकीट विक्री करण्यात आली होती. बॉडीगार्ड आणि रेडी हे सलमान खानचे सिनेमांच्या तिकिटांची किंमतही वाढवण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वीच मल्टिप्लेक्समध्ये तिकिटांची किंमत घटवण्यात आल होती. पण, आता मात्र ‘एक था टायगर’च्या यशाचं चित्र समोर दिसताच पुन्हा तिकिटांची किंमत वाढवण्यात आलीय. बॉलिवूडच्या इतिहासात ‘एक था टायगर’ यशाचं नवं रेकॉर्ड बनवू शकेल, अशी खात्री अनेकांनी व्यक्त केलीय.

.