सोनम कपूरची किंग खान, बिग बीला धोबीपछाड

सोनम कपूरच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली नसली तरी तिने एका ऑनलाईन पोलमध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना पिछाडीवर टाकलं आहे.

Updated: Mar 1, 2012, 03:54 PM IST

www.24taas.com, मुंबई
सोनम कपूरच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी केली नसली तरी तिने एका ऑनलाईन पोलमध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना पिछाडीवर टाकलं आहे. सोनम कपूरने केवळ बिग बी आणि किंग खानलाच मागे टाकलं अस नाही तर हृतिक रोशन आणि शशी थरुरांनाही मात दिली आहे. ट्विटरवर सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या यादीत सोनम कपूरने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

 

एका खाजगी ऑनलाईन फर्मने घेतलेल्या पोलमध्ये सोनम देशातील सर्वात प्रभावशाली सेलिब्रिटी ठरली आहे. सोनमच्या पारड्यात तब्बल एक दशलक्ष चाहत्यांनी कौल टाकला आहे तर पाच हजारावर ट्विटसद्वारे पसंती दिली आहे. सेलिब्रिटीच्या चाहत्यांची संख्या आणि ट्विटसला मिळणारा प्रतिसाद आणि दर्जा यावर या पोलचा निकाल निश्चित करण्यात आला.

सर्वात प्रभावशाली १० भारतीय सेलिब्रिटी

सोनम कपूर

शशी थरुर

प्रियांका चोप्रा

अमिताभ बच्चन

राम गोपाल वर्मा

हृतिक रोशन

किरण बेदी

फरहान अख्तर

अक्षय कुमार

सिद्धार्थ