अखिलेश सरकारचा 'कार'नामा

आमदारांना कार देण्याच्या अखिलेश सरकारच्या निर्णयावरून नवा वाद सुरु झालाय. भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी या गाड्या घेण्यास नकार दिला आहे. आमदारांची कारची हौस पुरवण्यासाठी आता आमदार निधीतून पैशांची उधळपट्टी केली जाणार आहे.

Updated: Jul 3, 2012, 02:26 PM IST

www.24taas.com, लखनौ

आमदारांना कार देण्याच्या अखिलेश सरकारच्या निर्णयावरून नवा वाद सुरु झालाय. भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी या गाड्या घेण्यास नकार दिला  आहे. आमदारांची कारची हौस पुरवण्यासाठी आता आमदार निधीतून पैशांची उधळपट्टी केली जाणार आहे.

उत्तर प्रदेशात 403 आमदार आहेत. त्यांच्यासाठी 80 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. पाच वर्षं ही गाडी आमदारांच्या नावे राहील. अखिलेश यादव सरकारच्या या निर्णयाने नवा वाद निर्माण होणार आहे. जनतेच्या पैशातून आमदारांची गाडीची हौस कशासाठी असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय.

मायावतींना धोबीपछाड देऊन नुकताच मुख्यमंत्री बनलेल्या अखिलेश यादवने आपल्या शासनात कुठलाही अवाजवी खर्च होणार नाही अशी ग्वाही दिली होती. मायावतींनी बनवलेल्या पार्कचेही हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचीही घोषणा त्याने दिली होती. मात्र, पदावर येताच आमदारांच्या कारचे चोचले पुरवण्यासाठी ८० कोटी रुपये उधळण्याचा अखिलेश सरकारने घेतलेला निर्णय वाद निर्माण करण्याची शक्यता आहे.