अखेर गौडा पायउतार, शेट्टर नवे मुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी आपल्या पदाचा बुधवारी राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाचे चार वर्षातील दुसरे मुख्यमंत्री होते.

Updated: Jul 11, 2012, 03:43 PM IST

www.24taas.com, बंगळुरू

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी आपल्या पदाचा बुधवारी राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाचे चार वर्षातील दुसरे मुख्यमंत्री होते. गौडा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे भाजप श्रेष्ठींकडूंन त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू होते.

 

गौडाने राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविला हे. त्यामुळे ग्रामीण विकास मंत्री जगदीश शेट्टर यांचा आता मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पक्षाने नवे नेते म्हणून शेट्टर यांच्या नावाला पसंती दिली होती.

 

संबंधित आणखी बातमी

 

सदानंद गौडांची राजीनाम्यास टाळाटाळ

भाजपपुढील कर्नाटकाची डोकेदुखी अजूनही संपत नाहीये. पक्षनेतृत्वानं जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला असला तरी सदानंद गौडांनी मात्र मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहेत. गौडांनी सलग दुस-या दिवशी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला दांडी मारलीय.