अभिनेता राजा चौधरीला अटक

जयपूर पोलिसांनी भोजपुरी सिने अभिनेता आणि टीव्ही कलाकार राजा चौधरी याला आपल्या एका मैत्रिणीसोबत दारू पिऊन धिंगाणा घातल्याबद्दल अटक केली आहे

Updated: Feb 3, 2012, 08:39 PM IST

www.24taas.com, जयपूर

 

जयपूर पोलिसांनी भोजपुरी सिने अभिनेता आणि टीव्ही कलाकार राजा चौधरी याला आपल्या एका मैत्रिणीसोबत दारू पिऊन धिंगाणा घातल्याबद्दल अटक केली आहे.

 

काल रात्री राजा चौधरी आपल्या एका मैत्रीणीसोबत दारूच्या नशेत जवाहरलाल नेहरू मार्गावरील एका प्रायव्हेट हॉस्पिटलबाहेर धिंगाणा घातल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपायुक्त राजेन्द्र सिंग शेखावत यांनी दिली. दोघांनाही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यावर राजा चौधरीला सीआरपीसी १५१ कलमाखाली अटक करण्यात आली. त्याच्या मैत्रिणीला मात्र सोडून देण्यात आलं. ही मैत्रीण जयपुरचीच रहिवासी असल्याचं शेखावत यांचं म्हणणं आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

Tags: