आता लक्ष्य 'चिदम्बरम' !

संसदेत आज पुन्हा एकदा 2G घोटाळ्याचे पडसाद उमटले. सीबीआय कोर्टानं चिदम्बरम यांना जोरदार झटका दिल्यामुळं विरोधक चिदम्बरम य़ांच्याविरोधात आणखीनच आक्रमक झालेत.

Updated: Dec 8, 2011, 08:01 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

संसदेत आज पुन्हा एकदा 2G  घोटाळ्याचे पडसाद उमटले. सीबीआय कोर्टानं चिदम्बरम यांना जोरदार झटका दिल्यामुळं विरोधक चिदम्बरम य़ांच्याविरोधात आणखीनच आक्रमक झालेत. लोकसभेच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत चिदम्बरम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळं तासाभरासाठी लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी चिदम्बरम यांच्यावरील बहिष्काराची भूमिका कायम ठेवलीय. त्यामुळं चिदम्बरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चिदम्बरम हे टू जी घोटाळा रोखू शकले असते असा आरोपही विरोधकांनी केलाय. मात्र सरकारनं चिदम्बरम यांची पाठराखण केलीय. चिदम्बरम यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. त्यामुळं आता काँग्रेस आणि विरोधकांमध्ये घमासान होण्याची चित्र दिसतंय.

 

2G स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांना जबरदस्त झटका बसलाय. 2G प्रकरणी दोन अधिका-यांच्या चौकशीसाठी CBI कोर्टानं मंजुरी दिलीय. याबाबत CBI आणि वित्तमंत्रालयाच्या अधिका-यांना कोर्टानं समन्स बजावलय. 2G  स्पेक्ट्रम विकण्याचा निर्णय चिदंबरम आणि ए. राजा यांनी सोबत घेतल्य़ाचा ठपकाही कोर्टानं ठेवलाय तसच त्याकाळी अर्थमंत्री असल्यामुळे स्वान टेलीकॉमला आणि युनिटेकला  स्पेक्ट्रम लायसन्स परदेशी कंपन्यांना विकण्यासाठी चिदंबरम य़ांनीच मंजूरी दिल्याचंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. या सगळ्या कारणांनी चिदंबरमच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीये.

 

संसदेत चिदंबरम यांच्याविरोधातील बहिष्कार कायम राहील असही भाजपनं म्हटलंय. चिदंबरम यांनी ठरवलं असतं तर ते 2G स्पेक्ट्रम घोटाळा रोखू शकले असते. विरोधकांच्या हातात आयतंच कोलीत आल्यामुळे विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. विरोधकांचा चिदंबरम यांच्यावर आधीपासूनच बहिष्कार आहे, त्यात एनडीएने आता चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी करीत संसदेत गदारोळ केलाय, त्यामुळे चिदंबरम आणि काँग्रेस आता चांगलेच अडचणीत आले आहेत. FDIच्या निर्णयानंतर कालच लोकसभेच कामकाज सुरळीत झालं होत मात्र आज पुन्हा 2G  घोटाळ्यावरुन लोकसभेच्या कामात अडथळा आलाय.