कनिमोळींना जामीन मिळणार का?

Last Updated: Friday, November 25, 2011 - 08:39

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

करुणानिधी यांच्या कन्या आणि डीएमके खासदार कनिमोळी यांच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. गेल्या वेळच्या सुनावणीवेळी कनिमोळींना जामीन देण्यास आपली हरकत नसल्याचं सीबीआयनं म्हटलं होतं. त्याचवेळी कनिमोळींच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचं मानण्यात येत होतं. मात्र हायकोर्टानं त्यावेळीही कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळला होता.

 

आजच्या सुनावणीत कनिमोळींना जामीन मिळणार की नाही, याबाबत आता उत्सुकता निर्माण झालीये. दरम्यान, कनिमोळींसह २ जी घोटाळ्यातील आणखी पाच आरोपींच्या जामिनावरही आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. माजी टेलिकॉम सेक्रेटरी सिद्धार्थ बेहुरा, फिल्म निर्माता करिम मोरानी, शरद कुमार, असिफ बलवा आणि राजीव अग्रवाल यांच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे.

First Published: Friday, November 25, 2011 - 08:39
comments powered by Disqus