जगदीश शेट्टर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांची वर्णी लावण्यात येडियुरप्पा यशस्वी झालेत. भाजप कोअर कमिटीच्या याबाबत निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलय.

Updated: Jul 7, 2012, 10:09 PM IST

www.24taas.com,  नवी दिल्ली 

 

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांची वर्णी लावण्यात येडियुरप्पा यशस्वी झालेत. भाजप कोअर कमिटीच्या याबाबत निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलय.

 

सदानंद गौडा यांना हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांचे समर्थक करत होते. अखेर भाजप हायकमांड त्य़ांच्या दबावापुढं झुकल्याचं मानलं जातय. कर्नाटकातले भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले शेट्टर पंचायत राजमंत्री आहेत. सदानंद गौडा आज संध्याकाळी राजीनामा देण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह आणि अरुण जेटली पर्यवेक्षक म्हणून जाणार आहेत.

 

एक नजर टाकुयात, जगदीश शेट्टर यांच्या कारकीर्दीवर –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक

अभाविपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश

१९९० मध्ये भाजपच्या हुबळी ग्रामीण विभागाच्या अध्यक्षपदी निवड

१९९४ साली भाजपचे धारवाड जिल्हा अध्यक्ष

१९९४ साली कर्नाटक विधानपरिषदेत निवड

१९९६ साली भाजपचे प्रदेश सरचिटणीस

१९९९ साली विरोधी पक्षनेतेपदी निवड

२००५ साली भाजप प्रदेशाध्यक्षपदी

२००६ साली धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये महसूलमंत्री

२००८ विधानपरिषद अध्यक्षपदी

२००९ साली ग्रामविकासमंत्री