मोदींना न्यायालयाची चपराक, लोकायुक्त कायम

गुजरात उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना चांगलीत चपराक दिली आहे. न्यायालयाने राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडून नियुक्ती करण्यात आलेली लोकायुक्तांची निवड योग्य असल्याचे म्हटले आहे. तसा निर्णय न्यालयाने दिला आहे.

Updated: Jan 18, 2012, 12:43 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद 

 

गुजरात उच्च न्यायालयाने  मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना चांगलीत चपराक दिली आहे.  न्यायालयाने राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडून नियुक्ती करण्यात आलेली लोकायुक्तांची निवड योग्य असल्याचे म्हटले आहे. तसा निर्णय न्यालयाने दिला आहे. हा मोदींसाठी मोठा धक्का आहे.

 

 

सात वर्षांपासून गुजरातमध्ये लोकायुक्तांची जागा रिक्त होती.  या जागेवर गतवर्षी ऑगस्टमध्ये राज्यपालांनी माजी न्यायाधीश आर. ए. मेहता यांची नियुक्ती केली होती. राज्यपालांनी मंत्रिमंडळाशी चर्चा न करता लोकायुक्तांची निवड केली आहे, असा आरोप या नियुक्तीवर मोदी यांनी केला होता. याबाबत मोदींनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही पत्र लिहिले होते.

 

लोकायुक्तांच्या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती. आज गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एम. सहाय यांनी सरकारची याचिका फेटाळत, लोकायुक्त निवड योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना  मोठा झटका बसला आहे.