शीला दीक्षितांकडून छठपूजेची सुट्टी 'कट'

छटपुजेला देण्यात येणारी सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सोमवारी दिल्ली कॅबिनेटने घेतला आहे. छटपूजा समारंभानिमित्त १ नोव्हेंबर रोजी राजधानीत सुट्टी देण्याची नीतीशकुमार यांची विनंती शीला दीक्षीत यांनी अमान्य केली आहे.

Updated: Oct 31, 2011, 11:52 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

छठपुजेचं राजकारण आता फक्त महाराष्टरात न उरता दिल्लीतही दिसू लागलंय. छटपूजेला देण्यात येणारी सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सोमवारी दिल्ली कॅबिनेटने घेतला आहे.

 

दिल्लीतल्या पूर्वांचलवासीयांच्या श्रद्धेचा विचार करुन छठपूजेच्या दिवशी सुट्टी घोषित करावी अशी विनंती बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना केली होती. पण, शीला दीक्षीत यांनी नीतीशकुमार यांचं न ऐकण्याचं ठरवलं आहे

नीतीशकुमार यांना उत्तरादाखल लिहीलेल्या पत्रात शीला दीक्षित यांनी असं म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांना आधीपासूनच बऱ्याच सुट्ट्या मिळत असताना त्यांना छठपूजेसाठी आणखी एक सुट्टी देणं योग्य ठरणार नाही.

 

नीतीशकुमार यांनी शीला दीक्षित यांना पाठवलेल्या पत्रात अशी मागणी केली होती की, ३१ ऑक्टोबरपासून ते २ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या छठपूजा समारंभानिमित्त १ नोव्हेंबर रोजी राजधानीत सुट्टी दिल्यास हा उत्सव साजरा करणाऱ्या मोठ्या समाजाची चांगली सोय होईल.

 

शीला दीक्षित यांनी मात्र ही विनंती अव्हेरली आहे.