घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांची चौकशी

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांची सुमारे सव्वा तीन तास चौकशी झाली. जैन या गुन्ह्यात थेट आरोपी नसले तरी त्यांच्याविरूद्धच्या काही पुराव्यांच्या आधारे चौकशी झाली. या आधी परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची चौकशी झाली.

Updated: Feb 3, 2012, 08:54 AM IST

www.24taas.com, जळगाव

जळगावमधल्या २९  कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांची सुमारे सव्वा तीन तास चौकशी झाली. जैन या गुन्ह्यात थेट आरोपी नसले तरी त्यांच्याविरूद्धच्या काही पुराव्यांच्या आधारे चौकशी झाली. या आधी परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची चौकशी झाली.

जळगावच्या नगराध्यक्षपदी गुलाबराव देवकर असताना हा घोटाळा झाला होता. माझा या घोटाळ्यात कोत्याही प्रकारचा सहभाग नसून, इतर नगरसेवकांच्या सहभागा बाबत कल्पना नसल्याचं स्पष्टीकरण गुलाबराव देवकर यांनी दिलं आहे. घोटाळ्याच्या काळातील सर्व नगरसेवकांची चौकशी करण्यात येत आहे.देवकर जळगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतानाच्या कार्यकाळात हा घोटाळा समोर आला होता. या घोटाळा प्रकरणात ते संशयित आरोपी आहेत. घोटाळ्यात आपला हात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यावेळी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी हेच कारभार चालवत होते आणि इतर नगरसेवकांनी केवळ सह्या करण्याचं काम केलं, असं स्पष्टीकऱण त्यांनी दिलंय. नगरसेवकांना या घोटाळ्याची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या घोटाळ्याच्या चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य कऱण्याची तयारी त्यांनी दाखवलीय. याच प्रकरणी बुधवारी नगराध्यक्ष, लक्ष्मीकांत चौधरी आणि चतर्भूज सोनवणे यांचीही पोलिसांनी चौकशी केली होती. या प्रकरणी माजी महापौर प्रदीप रायसोनी, मुख्याधिकारी पी. डी. काळे यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

[jwplayer mediaid="40898"]