बीडः उसतोड मजुराला जिवंत जाळले

उस तोडीसाठी घेतलेली उचल परत केली नाही म्हणून शेषराव तायडे या उस तोड मजुराला मुकादमाने जीवंत जाळल्याची घटना बीड जिल्ह्यातील सिंदफणा चिंचोळी येथे घडली. या मजूराने वशिष्ठ डाकेकडून उस तोडीला जाण्यासाठी दहा हजार रुपयांची उचल घेतली होती.

Updated: Jan 9, 2012, 02:32 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

उस तोडीसाठी घेतलेली उचल परत केली नाही म्हणून शेषराव तायडे या उस तोड मजुराला मुकादमाने जीवंत जाळल्याची घटना बीड जिल्ह्यातील सिंदफणा चिंचोळी येथे घडली. या मजूराने वशिष्ठ डाकेकडून उस तोडीला जाण्यासाठी दहा हजार रुपयांची उचल घेतली होती. शेषराव आणि त्याची पत्नी सांगली येथे एका कारखान्यात उस तोडणीसाठी जाणार होते. पण शेषराव तायडे हा डाके याच्या सोबत जाण्या ऐवजी दुसऱ्या ठेकेदारा बरोबर गेल्याने त्या दोघांमध्ये वाद झाला होता.

 

डाके याने रविवारी तायडे याच्या घरी जाऊन त्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. जवळपास ९० टक्के भाजलेल्या तायडेचे सोमवारी सकाळी निधन झाले. तायडेने मृत्यूपूर्वी जबाब दिला असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती नायब तहसिलदार एस.के.मंडे यांनी दिली आहे.

 

[jwplayer mediaid="26024"]

[jwplayer mediaid="26024"]