करतो कोण अन् मरतो कोण

नवी मुंबईतील सानपाडा येथे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली. सरफराज शेख वय वर्षे 27 हा दोन विद्यार्थ्यांचे भांडण सोडवायला गेला आणि स्वत:चा जीव गमावून बसला.

Updated: Dec 16, 2011, 12:58 PM IST

झी 24 तास वेब टीम, नवी मुंबई

 

नवी मुंबईतील सानपाडा येथे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली. सरफराज शेख वय वर्षे 27 हा दोन
विद्यार्थ्यांचे भांडण सोडवायला गेला आणि स्वत:चा जीव गमावून बसला. सरफराज हा व्यापारी होता.

 

ओरीएंटल कॉलेजच्या सागर या विद्यार्थ्याने अश्विनला मारण्यासाठी बाहेरून मुलं आणली. आश्विनला मुलं मारत असल्याचं बघून सरफराज शेख भांडण सोडवायला गेला असता त्या तरुणांनी सरफराजच्या डोक्यावर फटका मारला. हा फटका जिव्हारी लागल्याने सरफराजचा मृत्यू झाला.