
वय 75 वर्ष, उत्साह विशीतल्या तरुणासारखा; किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आजीबाईंनी वेधले लक्ष
जय भवानी, जय शिवाजी... 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्ताने रायगड किल्ल्याचा परिसर दुमदुमला. याच सोहळ्यात 75 वर्षांच्या आजाबाईंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो; नारायण राणे - दीपक केसरकर यांनी दाखवला राजकीय चमत्कार
भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. शरद पवारांनी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना यश आले नव्हते. अखेर शिंदे गट आणि भाजप युतीमुळे राजकीय चमत्कार घडला आहे.

राज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे
Weather Updates in Maharashtra: राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.

शिवराज्याभिषेक : शिवप्रेमींची अलोट गर्दी, महाड ते रायगड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
Shivrajyabhishek Din 2023: शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. त्यामुळे महाड ते रायगड रोडवर वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली आहे.

एकाच कुटुंबातील 5 जणांचा बाईकवरुन प्रवास; भीषण अपघातात माय लेकाचा मृत्यू
पत्नी आणि तीन मुलांनासह ते नेमहीच बाईकने प्रवास करायचे. हे पाच जण बाईकवरुन निघाले होते. मात्र, भीषण अपघातात पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

रायगडमध्ये जून महिन्यात चक्रीवादळाची शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले महत्त्वाचे आदेश
Cyclone Biparjoy In Maharashtra: रायगडकरांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या दक्षतेच्या सुचना. जून महिन्यात वादळाची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

किल्ले रायगडावर दरड कोसळली; शिवप्रेमीचा मृत्यू
किल्ले रायगडला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. अशातच दरड कोसळून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मान्सूनच्या आगमन तारखेवर शिक्कामोर्तब; त्याआधी उष्णतेची लाट झेलण्यासाठी सज्ज व्हा
Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उकाडा चांगलाच वाढताना दिसत आहे. ज्यामुळं हा मान्सून नेमका येणार तरी कधी हाच प्रश्न वारंवार विचारला जातोय.

Shivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर
Shivrajyabhishek Din 2023: शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे नाराज झालेत. शिवराज्याभिषेक सोहळा आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले.

दाहक वास्तव; काय वेळ आली महिलांवर? एक हंडा पाण्यासाठी अख्खी रात्र विहिरीवर !
Water Shortage in Karjat: कर्जत तालुक्यातल्या आदिवासी महिलांचा एक हंडा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरु आहे. क हंडा पाण्यासाठी इथल्या आदिवासी महिला अख्खी रात्र विहिरीवर जागून काढत आहेत. दरम्यान,येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.

मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 'या' तारखेपासून सुसाट धावणार
Mumbai - Goa Vande Bharat Train: कोकण रेल्वे मार्गावर (kokan railway) मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

मुंबई-गोवा महामार्गासह 'या' राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी; शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निर्णय
Heavy Vehicles Ban On Mumbai Goa Highway : किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

Weather Update : कोकणात पाऊस, पुढच्या पाच दिवसांमध्ये काय असतील हवामानाचे तालरंग? जाणून घ्या
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अद्यापही मान्सून आलेला नाही. पण राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसताना दिसत आहेत. काही भागात त्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ठरत आहेत तर कुठे बागायतदारांचं मोठं नुकसान करत आहेत.

ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण
Maharashtra Politics News : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदेश पारकर यांनी त्यांची भेट घेतली.

आईचा त्रास सहन झाला नाही; 14 वर्षाच्या मुलाने चार दिवसांत असे काम केली की...
प्रबळ इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्टही साध्य करता येवू शकते. आईचा त्रास पाहून पालघरमधील एका मुलाने अंगणात विहीर खोदली. त्याच्या मेहनतीला यश आले आणि विहीराला पाणी देखील लागले आहे.

अवघ्या 30 सेकंदात मृत्यू; पाच वर्षाच्या चिमुरड्याची कुटुंबासह शेवटची पिकनीक
रायगडमध्ये 5 वर्षाच्या लहानग्याचा स्विमिंग पूल मध्ये पडून बुडून मृत्यू झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

बैलगाडी स्पर्धेला गालबोट, बैल उधळला आणि 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन...
Bullock Cart Race in Chiplun : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता गावागावत या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चिपळूण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेदरम्यान, बैल उधळल्याने एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

Weather Forcast : सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल तर होरपळाल; राज्यात चिंताजनक तापमानवाढ
Maharashtra Weather Updates : राज्यात अवकाळीनं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर एकाएकी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण पट्ट्यामध्ये तापमान वाढीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच...

Electric Bike : 35 हजार रुपयात इलेक्ट्रिक बाईक, मराठी मुलांची गगनभरारी
Electric Bike : सिंधुदुर्गातील दोन तरुणांनी कमाल केली आहे. भंगारात टाकलेले दुचाकींचे पार्ट आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य बाजारातून खरेदी करुन दोन महिन्याच्या कालावधीत इलेक्ट्रिक दुचाकी बनविली आहे. ही दुचाकी एकदा चार्ज केली की तीन तासात तब्बल 50 ते 55 किलोमीटरपर्यंत धावू शकते.