ठाण्याच्या तलावातून मगरीची पाठवणी

ठाण्याच्या उपवन तलावामध्ये गेल्या 12 वर्षांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मगरीला वन विभागानं पकडून बोरीवलीच्या राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसीविहार या तलावात रवानगी केली

Updated: Apr 26, 2012, 08:16 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाण्याच्या उपवन तलावामध्ये गेल्या 12 वर्षांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मगरीला वन विभागानं पकडून बोरीवलीच्या राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसीविहार या तलावात रवानगी केली.

 

सात फूट लांबीच्या या मगरीचा प्रजनन काळ जवळ आला होता. त्यामुळं पुढील काळात ही मगर ठाणेकरांना धोकादायक बनू शकली असती. तसंच आसपासच्या नागरिकांनाही धोका निर्माण झाला असता. त्यामुळं गेली अनेक दिवस वनाधिकारी मगरीला पकडण्याच्या प्रयत्नात होते.

 

आज सकाळी मगरीला पिंजऱ्यात पकडण्यात त्यांना यश आले.

 

[jwplayer mediaid="90193"]