तटकरेंवर आरोप करणारे पाटील अडचणीत

रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यावरही आरोप होऊ लागलेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यापारी जेट्यांचं बांधकाम केल्याची लेखी तक्रार पाटील यांच्याविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Updated: Jun 21, 2012, 10:58 AM IST

www.24taas.com, अलिबाग

 

रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यावरही आरोप होऊ लागलेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यापारी जेट्यांचं बांधकाम केल्याची लेखी तक्रार पाटील यांच्याविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
धरमतर इथं पीएनपी कंपनीनं बनावट कागदपत्रकांच्या आधारे दोन जेट्या उभारल्याची बाब समोर आलीये. आमदार जयंत पाटील यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या या कंपनीनं सरकारची फसवणूक केल्याच्या दोन लेखी तक्रारी अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलिस ठाण्यात करण्यात आलीये. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी याप्रकरणी जयंत पाटील यांना लक्ष केले आहे.

 

मेरीटाईम बोर्डाचे मोरा येथील तत्कालीन बंदर अधिकारी भटनागर यांनी जेटी बांधण्यास परवानगी दिली नव्हती. तरी परवानगी असल्याचं बनावट पत्र सादर करण्यात आल्याचा आरोप होतोय. मुळात अशी परवानगी देण्याचे अधिकार बंदर विभागाच्या अधिका-यांना नसल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे.

 

आमदार जयंत पाटील यांनी मात्र सर्व आरोप फेटाळलेत. मी करार रद्द करण्यास तयार आहे. माझी गुंतवणूक मला परत मिळावी, असा सूर त्यांनी लावला. तक्रारीची संबंधित खात्याकडून माहिती घेतल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास पोयनाड पोलिसांनी नकार दिलाय. याप्रकरणी पीएनपी कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रीया उपलब्ध झाली नाही.

 

 

संबंधित आखणी बातमी

बेहिशेबी मालमत्ता : तटकरेंविरोधात याचिका

सत्तेचा गैरफायदा घेऊन कुटुंबियांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप झाल्यानंतर जलसंपदा मंत्री सुनील तटकरे अडचणीत आले आहेत. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आता तटकरेंविरोधात जनहित याचिका दाखल करणयात आली आहे.